दूध पोहे : दुध पोहे ही पौस्टिक व लवकर होणारी डीश आहे. लहान पणी आमची आजी भूक लागली की पटकन बनवून द्यायची. व आम्ही ती आवडीने खायचो. पोहे हे सर्वाना आवडतातच ह्यामध्ये दुध आहे त्याने पोहे छान भिजले जावून थोडेसे मऊ होतात. काजू, किसमिस घातल्यामुळे ती चांगली पौस्टिक होते. व्ह्नीला ईसेन्स व जायफळ पावडर घातल्याने त्याचा सुगंध चांगला पण छान येतो. ही पौस्टिक डीश लहान मुलांना खूप आवडेल.
दुध पोहे बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
२ कप दुध
३ टे स्पून साखर
१ टे स्पून किसमिस
१ कप पोहे
१ टे स्पून बदाम (तुकडे करून)
व्ह्नीला ईसेन्स
जायफळ पूड चवीने.
कृती :
दुध, साखर, बदाम व किसमिस पाच मिनिट उकळून घ्या. पोहे धुवून गरम दुधात मिक्स करून दोन मिनिट मंद विस्तवावर गरम करून घ्या. थंड झाल्यावर त्यामध्ये व्ह्नीला ईसेन्स व जायफळ पूड मिक्स करा.
थंड करून मगच सर्व्ह करा.
The English language version of the Dodh Pohe recipe is published in the article – Here