सोलाण्याच्या सामोसे : सोलाणे म्हणजे हिरवे ताजे हरबरे. ताजे हिरवे हरभरे चवीला खूप छान लागतात. नुसते खायलासुद्धा गोड लागतात. ताजे हरबरे थोडे भाजून घेतल्याने खमंग लागतात. व तळल्यावर कुरकुरीत लागतात.
साहित्य :
२ कप हिरवे ताजे हरबरे (सोललेले)
१/४ कप ओला नारळ (खोवून)
१ टे स्पून पंढरपुरी डाळ्याची पावडर
३ हिरव्या मिरच्या
१ टी जिरे पूड
मीठ चवीने
१/४ टी स्पून हळद
तूप तळण्यासाठी
पारीसाठी
२ कप बारीक रवा
१ टे स्पून तेल
१/४ टी स्पून हळद
मीठ चवीने
कृती :
रव्यामध्ये मीठ, हळद व थोडे गरम मोहन घालून मळून घ्या. व बाजूला ठेवा.
कढई गरम करून त्यामध्ये सोलणे लालसर रंगावर भाजून घ्या. थंड झाल्यावर वाटून घ्या. नंतर त्यामध्ये खोवलेला नारळ, पंढरपुरी डाळ्याची पावडर, हिरवी मिरची, मीठ, हळद, जिरे पूड घालून सामोस्याचे सारण तयार करून घ्या.
भिजवलेले रव्याचे पीठ थोडे कुटून घ्यावे. नंतर त्याचे छोटे लिंबा एव्ह्डे गोळे करून पुरी सारखे लाटून घ्या व त्यामध्ये बनवलेले एक टे स्पून सारण भरून पुरीला समोसा सारखा आकार द्या.
कढई मध्ये तूप गरम करून त्यामध्ये समोसे छान कुर कुरीत तळून घ्या.
गरम गरम टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.