कालेजामून : कालेजामून म्हंटल की सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटते. ही स्वीटडीश आपण सणावाराला किंवा पार्टीला सुद्धा करता येतात. कालेजामून हे घरी झटपट व सुंदर बनवता येतात. मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीला बनवायला पण छान आहेत. मुले सुद्धा आवडीने खातात.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: ८ बनतात
साहित्य : जामूनसाठी
१ कप खवा
१/४ कप पनीर
१/४ कप मैदा
एक चिमुट बेकिंग पावडर
१/२ टी स्पून साखर
वेलचीचे दाणे
तेल जामून तळण्यासाठी
साखरेच्या पाकासाठी
३/४ कप साखर
१ कप पाणी
कृती :
जामूनसाठी : खवा, पनीर, मैदा, बेकिंग पावडर, साखर घालून चांगले मळून घ्या. मळून झाल्यावर त्याचे छोटे-छोटे गोळे तयार करा. गोळे तयार करतांना प्रतेक गोळ्यामध्ये दोन-दोन वेलचीचे दाणे ठेवा व गोळा नीट बंद करा. असे सर्व गोळे तयार करून घ्या.
साखरेचा पाकासाठी : एका जाड बुडाच्या पातेल्यात साखर व पाणी एकत्र करून विस्तवावर साखरेचा पाक करायला ठेवा. पाक थोडा घट्ट झाला पाहिजे.
कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बनवलेले गोळे चॉकलेटी रंगावर तळून घ्या. नंतर सगळे जामून पाकामध्ये घालून दोन मिनिट मंद विस्तवावर गरम करून घ्या.
मग १५ मिनिटा नंतर सगळे जामून पाकामधून काढून ठेवून थंड करायला ठेवा.
The English language version of the Kala Jamun preparation is published in the article – Here