लाल भोपळ्याच्या पुऱ्या : लाल भोपळ्याच्या पुऱ्या हअ एक गोड पदार्थ आहे. ह्या पुऱ्या चवीस्ट लागतात. ह्यामध्ये लाल भोपळा आहे त्याने चव छान येते. तसेच ह्यामध्ये साखरे आयवजी गुळ वापरलेला आहे. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहेत. तसेच त्या पौस्टिक पण आहेत. ही एक महाराष्ट्रियन डीश आहे. नाश्त्याला सुद्धा बनवता येते.
साहित्य : १/२ कप लाल भोपळ्याचा पल्प, १/२ कप गुळ (चिरून), मीठ चवीने, गव्हाचे पीठ, तळण्यासाठी वनस्पती तूप/ तेल
कृती : लाल भोपळ्याचे साल काढून, धुवून मग थोडे भांड्यात पाणी घेवून भोपळा थोडा शिजवून घ्या. मग किसणीने किसून त्यामध्ये गुळ व मीठ मिक्स करून त्यामध्ये बसेल तेव्हडे गव्हाचे पीठ मिक्स करावे लागले तर थोडे दुध घालावे व घट्ट कणिक मळतो तशी मळावी. नंतर त्याचे छोटे लिंबा एव्ह्डे गोळे करून लाटून घ्या.
कढई मध्ये तेल अथवा तूप चांगले गरम करून पुऱ्या तळून घ्याव्यात.
The English language version of the Lal Bhoplyachi Puri is given in the article – Here