मायक्रोनी सामोसा : मायक्रोनी सामोसा ही एक नाश्ताची डीश आहे. मायक्रोनी लहान मुलांना खूप आवडते. त्याचे सामोसे बनवले तर छोटे कंपनी एकदम खूष. हे सामोसे पार्टीला स्टारर्र म्हणून बनवता येईल. ह्यामध्ये आपल्याला जो पाहिजे तो आकार द्या. आपण मायक्रोनीचे समोसे बनवणार आहे तर त्याला मायक्रोनी सारखा आकार दिला तर लहान मुलांना खूप आवडेल व दिसायला पण सुंदर दिसेल.
साहित्य : सारणा साठी : १ कप मायक्रोनी, १ छोटा कांदा, १ छोटा टोमाटो, १/२ टी स्पून लाल मिरची पावडर, १ चीज क्यूब, १ टे स्पून तेल, २ टे स्पून गाजर (किसून), १/४ टी हळद, २ टे स्पून कोथंबीर, मीठ चवीने
पारी साठी : २ कप मैदा, १ टी स्पून ओवा, १ टी स्पून जिरे, १ टे स्पून तेल (गरम मोहन), १/४ टी स्पून हळद, मीठ चवीने, तळण्यासाठी तेल
कृती : सारणा साठी :
१) प्रथम मायक्रोनी शिजवून घ्यावी. चीज किसून घावे. कोथंबीर चिरून घ्यावी. गाजर किसून घ्यावे.
२) एका कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा, टोमाटो घालून गुलाबी रंगावर परतून घ्यावा.
३) कांदा परतून झाल्यावर त्यात लाल मिरची पावडर, हळद मीठ, किसलेले गाजर व शिजवलेली मायक्रोनी घालून २ टे स्पून पाणी घालून परत दोन मिनिट परतून घ्यावी.
४) मायक्रोनी परतून झाल्यावर त्यामध्ये किसलेले चीज व कोथंबीर घालून मिक्स करावे.
पारीसाठी :
१) मैदा, हळद व मीठ एकत्र करून चाळून घ्या. ओवा व जिरे थोडे भरडून घ्या.
२) तेल अगदी कडकडीत गरम करून घ्या.
३) गरम तेल, ओवा, जिरे व मैदा एकत्र करून थोडे थोडे लागेल तसे पाणी घालून पीठ मळून घेवून १०-१५ मिनिट बाजूला ठेवावे. पीठ थोडे घट्ट माळून घ्या.
समोसे तयार करण्यासाठी
१) मैद्याच्या पीठाचे लिंबा एव्ह्डे गोळे करून घेवून पुरी लाटून घ्या. मग त्यामध्ये १ टे स्पून मायक्रोनीचे सारण भरून घ्या.
२) सारण ठेवल्यावर प्रथम पुरी बाजूनी मुडपून घ्या मग गोल गुंडाळी करून घ्या. त्याला मायक्रोनी सारखा आकार द्या. जो आवडेल तो म्हणजे समोसा, मोदक असे आकार द्या. असे सर्व समोसे बनवून घ्या.
३) कढई मध्ये तेल गरम करून घेवून समोसे थोडे कुरकुरीत तळून घ्या.
४) गरम गरम समोसे सॉस बरोबर किंवा चिंचेच्या चटणीबरोबर किंवा पुदिना चटणीबरोबर सर्व्ह करा.
टीप :
१) मायक्रोनी शिजवण्यासाठी एका कढईत ४-५ पेले पाणी घेवून त्यामध्ये १ टी स्पून मीठ व १ टी स्पून पाणी घालून उकळी आल्यावर त्यामध्ये मायक्रोनी घालून ५-७ मिनिट शिजवून घ्या. मायक्रोनी खूप शिजता कामा नये.
२) पीठ मळून घेतांना थोडे घट्ट मळून घ्या म्हणजे समोसे तेलकट होत नाहीत व छान कुरकुरीत होतात. जर पीठ सैल झाले तर सोमोसे खूप तेलकट होतील.