मँक्रोनी विथ चीज अँड ब्रोकोली : मँक्रोनी ही लवकर बनणारी डीश आहे. ही एक इटालीयन डीश आहे. आता इटालीयन डीश महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवली आहे. मुलांना शाळेत जातांना डब्यात देता येईल तसेच लहान मुलांच्या पार्टीला पण बनवता येईल. ह्या मध्ये ब्रोकोली चांगली लागते व ती पौस्टिक सुद्धा आहे. बेसिलने छान सुगंध येतो. चीजने ह्याची चव खूप छान लागते.
The English language version of the same Macaroni Dish is published in the article – Here
साहित्य : २ कप मँक्रोनी, ७-८ लसूण (बारीक चिरून), १ १/२ कप ब्रोकोली (त्याचे तुरे कापावे), १ टे स्पून बेसिल पाने (बारीक चिरून), १/३ कप दुध, १/४ कप फ्रेश क्रीम, १/२ कप चीज (किसून), २ टे स्पून बटर, टी स्पून पांढरी मिरे पावडर, मीठ चवीने.
कृती : एका कढई मध्ये ६ कप पाणी गरम करून त्यामध्ये मध्यम विस्तवावर मँक्रोनी पाच मिनिट शिजवून घ्या. शिजल्यावर पाणी काढून त्यावर थंड पाणी घालावे.
कढई मध्ये बटर गरम करून त्यामध्ये लसूण व ब्रोकोली घालून दोन मिनिट फ्राय करा. मग त्यामध्ये दुध व फ्रेश क्रीम घालून मिक्स करून दोन मिनिट शिजून झाल्यावर मीठ, मिरे पावडर घालून मिक करा मग त्यामध्ये शिजवलेली मँक्रोनी, चीज व बेसिलची पाने घाला.
गरम गरम सर्व्ह करा.