मलई बर्फी : मलई बर्फी ही एक बंगाली स्वीट डीश आहे. ही बर्फी आपण घरी सोप्या पद्धतीने व लवकर कशी बनवू शकतो हे सोप्या पद्धतीने दिले आहे. बंगाली मिठाई ही जरी बंगाली लोकांची मिठाई असली तरी महाराष्ट्रात ती खूप प्रसिद्ध आहे. बंगाली मीठाई बाहेर किती महाग असते. तीच जर आपण घरी बनवली तर घरी चांगली व स्वत पण होते. मिल्क पावडर घातल्याने दुध जास्त आटवावे लागत नाही व बर्फी छान दाणेदार होते.
मलई बर्फी बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ८ वड्या बनतात
साहित्य :
१/२ लिटर म्हशीचे दुध
४ टी स्पून मिल्क पावडर किंवा २ टी स्पून खवा
५ टी स्पून साखर
एक चिमुट तुरटी
१/२ टी स्पून वेलची पूड
बदाम तुकडे
कृती : एका नॉन स्टिक कढई मध्ये दुध, साखर व तुरटी घालून दुध मंद विस्तवावर आटवत ठेवा. दुध इतके आटवा की घट्ट झाले पाहिजे मग त्यामध्ये वेलचीपूड घालून मिक्स करा व मिश्रण एका स्टीलच्या प्लेट मध्ये ओतून एकसारखे करून वरतून बदामाचे तुकडे घालून सजवा.
थंड सर्व्ह करा.
The English language version of the Malai Burfi recipe can be seen in the article – Here