मसाला पुरी : मसाला पुरी ही एक मराठी लोकांची आवडता पदार्थ आहे. ह्या पुरीमध्ये कसुरी मेथी आहे त्यामुळे पुरी चवीस्ट लागते. कसुरी मेथी म्हणजे सुकवलेली मेथी होय. तिखट- मीठ घातल्याने पुरीची चव चांगली लागते. ह्या पुऱ्या मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला चांगल्या आहेत. गव्हाचे पीठ आहे त्यामुळे त्या पौस्टिक तर आहेतच. नेहमीच डब्यात पोळी भाजी देण्या आयवजी मधून मधून ह्या पुऱ्या द्यायला हारकत नाही. तसेच ह्या पुऱ्यामध्ये बेसन घातल्या मुळे छान खुसखुशीत होतात. टोमाटो सॉस बरोबर चांगल्या लागतात.
साहित्य : २ कप गव्हाचे पीठ, १ टे स्पून बेसन, १ टी स्पून लाल मिरची पावडर, १ टी स्पून हळद, १ टी स्पून कसुरी मेथी, १ टी स्पून मीठ (मीठ थोडे जास्त घातलेतरी चांगले लागते.) १ टे स्पून तेल (गरम करून), तेल तळण्यासाठी
कृती : गव्हाचे पीठ, बेसन, लाल मिरची पावडर, हळद, कसुरी मेथी, मीठ व गरम तेल घालून मिक्स करून घ्या. मग पुरीचे पीठ घट्ट मळून १०-१५ मिनिट तसेच ठेवा मग त्याचे लिंबा एव्ह्डे गोळे करून घेवून त्याच्या पुऱ्या लाटून घ्या.
कढईत तेल गरम करून पुऱ्या तळून घ्या.
The English language versions of the Masala Puri recipes can be seen in the article – Here and Here