मोड आलेल्या मसूरची आमटी : मोड आपलेल्या मसूरची हिरव्या मसाल्याची आमटी ही खूप खमंग लागते. अश्या प्रकारची आमटी सीकेपी ह्या लोकांमध्ये बनवली जाते. मोड आलेले मसूर हे पचायला हलके असतात. व पौस्टिक सुद्धा असतात. ह्या आमटी मध्ये कोथंबीरीचा मसाला भाजून घेतल्यामुळे ती खमंग लागते.
साहित्य :
१ कप मोड आलेले मसूर
१/४ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हळद
१/२ टी स्पून गरम मसाला
२ आमसुले, मीठ चवीने
हिरवा मसाला :
१ कप कोथंबीर
५-६ लसून पाकळ्या
१/२” आले तुकडा
२ हिरव्या मिरच्या
१ टी स्पून शहाजिरे
फोडणी साठी :
१/२ टे स्पून तेल
१ छोटा कांदा
एक चिमुट हिंग
कृती :
प्रथम मसूर थोडे शिजवून घ्या किंवा मोड आलेल्या मसुराला एक शिट्टी काढा.
हिरवा मसाला : कोथंबीर, आले-लसून, शहाजिरे, हिरव्या मिरच्या बारीक वाटून घ्या.
एका कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, हिंग घालून थोडे परतून घ्या. मग त्यामध्ये वाटलेला हिरवा मसाला घालून तेल सुटे परंत भाजून घ्या. मसाला भाजून घेतल्यावर हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, मीठ घालून शिजवलेले मसूर घालून २ कप पाणी घाला किंवा आमटी जशी पातळ व घट्ट हवी असेल त्यानुसार पाणी घाला.
आमटीला चांगली उकळी येवू द्या. मग खाली उतरवून आमसूल घाला.
गरम गरम आमटी भाता बरोबर सर्व्ह करा.
We absolutely love your blog and find many of your post’s to
be exactly I’m looking for. Does one offer guest writers to
write content for yourself? I wouldn’t mind creating a post or elaborating on some of the subjects you write about here.
Again, awesome web log!