ओट्स डोसा : ओट्स डोसा ही एक पौस्टिक डीश आहे. ती मुलांच्या डब्या साठी, नाश्त्याला व जेवणात सुद्धा बनवता येते. ओट्स किती पौस्टिक आहेत ते सगळ्यांना माहीत आहेतच. जर हा डोसा बनवतांना थोडा रवा मिक्स केला तर डोसा कुरकुरीत होतो. व त्यामध्ये आले, हिरवी मिरची व कोथंबीर घातली तर त्या डोश्याची चव वेगळीच लागते. तसेच ह्यामध्ये गाजर किसून घातले तर अजूनच छान लागते.
The English language version of the Oats Dosa recipe is given in the article – Here
ओट्स डोसा बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट
वाढणी: ४ डोसे बनतात
साहित्य :
१ कप ओट्स
१/२ कप रवा
२ हिरव्या मिरच्या
१/२ टी स्पून आले (किसून)
१ टे स्पून कोथंबीर
२ टे स्पून गाजर
मीठ चवीने
तेल डोसा फ्राय करण्यासाठी
कृती :
ओट्स व रवा १०-१५ मिनिट भिजत ठेवा मग मिक्सरमध्ये थोडेसे ग्राईड करा. हिरवी मिरची पेस्ट करा म्हणजे लहान मुलांना तिखट लागणार नाही. आले व गाजर किसून घ्या. कोथंबीर बारीक चिरून घ्या.
वाटलेले ओट्स, हिरवी मिरची, आले, कोथंबीर, गाजर, मीठ घालून मिक्स करावे. लागेल तसे पाणी घालावे. पण मिश्रण खूप पातळ नसावे आपण जसे डोसे बनवतो तसे भिजवावे.
नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर थोडेसे तेल लावावे व डोसे करावेत. दोन्ही बाजूनी भाजून घावे म्हणजे छान कुरकुरीत होतील.
नारळाच्या चटणीबरोबर किंवा टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करावे.