चिंचेचे पाणी – इम्ली का पानी : चिंचेचे पाणी हे महाराष्ट्रात भाजी, आमटी, वड्या ह्या साठी जास्तीकरून वापरले जाते त्यामुळे भाजी आमटी स्वादीस्ट लागते. तसेच चिंचेचे पाणी फास्ट फूड साठी म्हणजे आपली सर्वांची आवडती भेळ, पाणीपुरी, रगडा, S.P.D.P ह्यासाठी तर लागतेच. जर थोडे जास्त चिंचेचे पाणी बनवून फ्रीज ठेवल्यास आपल्याला कधी पण वापरता येते. पटकन कधी भेळ, पाणीपुरी भाजीत पण टाकता येते. तसेच चिंचेची चटणी समोसा बरोबर खूप छान लागते.
The English language version of the Tamarind Water recipe is published in the article – Here
चिंच हे आंबटगोड व तुरट असते. चिंचही नेहमी जुनी वापरावी कारण ती जास्त गुणकारी असते. चिंच ही आंबट, जड, वायुहारक, पिक्त, कफ, आणि रक्तविकारावर उपयोगी आहे. सुकलेली चिंच हृदयास हितकारक व हलकी असते. तिच्या सेवनाने श्रम दूर होतात. तसेच उष्मघातात आराम वाटतो.
चिंचेचे पाणी घरी कसे लवकर व चांगले बनवता येईल ती पद्धत सोप्या भाषेत दिली आहे.
साहित्य : १ कप चिंच (जुनी बिया काढून), २ कप पाणी
कृती : २ कप पाणी गरम करून त्यामध्ये चिंच १५-२० मिनिट भिजत ठेवा. नंतर हाताने कुस्करून त्याचा कोळ काढून घ्या. मग गाळणीने गाळून बरणीत भरून ठेवा.
टीप : जर तुम्हाला चिंचेचे पाणी जास्त आंबट पाहिजे असेल तर चिंच जास्त वापरा.
भेळ, पाणीपुरी ह्यासाठी चिंचेचे पाणी घेवून त्यामध्ये शेंदेलोण-पान्देलोण मीठ, लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर व गुळ मिक्स करून थोडे पाणी उकळून थंड करून वापरता येते.