रताळ्याची टाँफी : आषाढी एकादशी आली की बाजारात रताळी यायला लागतात. रताळ्याची टाँफी ही लवकर होणारी व चवीला चांगली लागणारी आहे. आपण रताळ्या पासून रताळ्याची खीर, रताळ्याचा कीस बनवतो. ही रताळ्याची टाँफी करून बघा नक्की सगळ्यांना आवडेल. ही टाँफी महाराष्ट्रात कोकण ह्या भागात केली जाते. साबुदाण्याच्या खिचडी बरोबर खूप छान लागते.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
The Marathi language video of this Sweet Potato Toffee can be seen on our YouTube Channel: Maharashtrian Traditional Ratalyachi Toffee Sweet Potato Toffee
साहित्य :
२ मध्यम आकाराची रताळी
१ कप साखर
१ टी स्पून वेलची पावडर
१/२ कप तूप तळण्यासाठी
कृती :
१] रताळी चांगली धुवून उकडून घ्या. उकडताना ३/४ इतकीच उकडा.
२] रताळी थंड झाल्यावर त्याची साले काढून त्याच्या गोल गोल चकत्या करा.
३] एका मध्यम आकाराच्या भांड्यात साखर व दोन टे स्पून पाणी घालून मंद विस्तवावर पाक करायला ठेवा. पाक थोडा घट्ट झाला पाहिजे.
४] एका कढई मध्ये तूप गरम करून रताळ्याचे काप गुलाबी रंगावर तळून घ्या.
५] नंतर तळलेले काप साखरेच्या पाकात घाला व दोन-तीन मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या.
६] रताळ्याची toffee गरम किंवा गार चांगली लागते.
टीप :
१) रताळी शक्यतो लहान आकाराची घ्यावीत म्हणजे चकत्या पण लहान छान दिसतात.
२) रताळी जास्त उकडून घेवू नका नाहीतर त्याच्या चकत्या करतांना व तळताना ती तुटतील.
The English language version of the Sweet Potato Vadi is published in the Article – Here