तोंडल्याची कोशिंबीर – Ivy Gourd – Tindora : तोंडल्याची ह्या प्रकारची कोशिंबीर कारवारी पद्धतीची आहे. आपण नेहमीच टोमाटो, काकडी, गाजर ह्याची कोशिंबीर करतो. तोंडल्याची कोशिंबीर हा एक वेगळा प्रकार आहे. व अगदी चटपटीत प्रकार आहे. दिसायला पण सुंदर दिसते.
साहित्य :
२५० ग्राम कोवळी तोंडली
१ मध्यम कांदा (बारीक चिरून)
१/२ कप ओला नारळ (खोवून)
१/४ टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ व चिंच चवीने
१/२ कप तेल तोंडली तळण्यासाठी
कृती :
तोंडली धुवून बारीक चिरावी मग त्याला मीठ लावून नंतर तोंडली पिळून पाणी काढावे व कोरडी करावीत.
खोलगट तव्यावर तेल गरम करून चिरलेली तोडली गुलाबी रंगावर परतून घ्यावी. मग गार झाल्यावर त्यात खोवलेले खोबरे, चिरलेला कांदा, चिंचेचे पाणी (अगदी चवी पुरते), लाल मिरची पावडर व कोथंबीर, मीठ (आधी चव बघून मग लागेल तेव्हडे घालावे) घालून चांगले मिक्स करावे.