बेसन पेरून मेथीचीभाजी : मेथीची भाजी ही खूप चवीस्ट लागते. ह्या भाजीमध्ये चना डाळीचे पीठ [ बेसन ] घातले आहे. आपण नेहमी लसूण व हिरवी मिरची फोडणी घालून भाजी बनवतो. चणाडाळीचे पीठ घालून भाजी बनवलेली छान चवीस्ट लागते. लहानमुले मेथीची पीठ पेरून बनवलेली भाजी आवडीने खातात. गरम गरम भाकरी बरोबर ही भाजी छान लागते.
बेसन पेरून मेथीचीभाजी बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
१ मेथीची जुडी
१/४ कप चना डाळीचे पीठ
१ टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
१ टे स्पून तेल
१/४ टी स्पून हिंग
१ मध्यम कांदा (चिरून)
कृती :
मेथीची भाजी निवडून धुवून बारीक चिरावी. कांदा चिरून घ्यावा.
कढई मध्ये तेल गरम करून हिंग व कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. त्यामध्ये चिरलेला मेथीची भाजी घालून परतून घ्यावी मग झाकण ठेवून ५ मिनिट भाजी मंद विस्तवावर शिजवून घ्यावी. मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, मीठ घालून मिक्स करून चणाडाळ पीठ घालून मिक्स करावी. भाजी थोडी कोरडी झालीकी चवी पुरती साखर घालावी व गरम गरम भाकरी बरोबर सर्व्ह करावी.
The English language version of the Methi Besan Bhaji is published in this – Article