बिरड्याची खिचडी Birdyachi – Valachi Khichdi: बिरड्याची खिचडी ही चवीला खूप छान लागते. बिरडे म्हणजे वाल हे आपल्याला माहीत आहेच. वाल हे चवीला मधुर, थोडे जड, पण ते बलदायक, व पोट साफ करणारे असतात. वालामध्ये प्रोटीन, सोडीयम, जीवनसत्व “ए” असते. वालाची उसळ वा त्याची आमटी पण खूप चवीस्ट लागते.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
२ कप बासमती तांदूळ
१ कप मोड आलेले वाल
२ टी स्पून जिरे
५ लवंग
२ तुकडे दालचीनी
१/४ टी हिंग
१ जायफळ तुकडा
२ टे स्पून कोथंबीर
२ टे स्पून नारळ खोवून
मीठ चवीने
फोडणी साठी
१ टे स्पून तेल
कृती : बासमती तांदूळ धुवून बाजूला ठेवा. वाल सोलून घ्या. जिरे, लवंग, दालचीनी, हिंग जायफळ बारीक कुटून घ्या.
एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करून त्यामध्ये सोललेले बिरडे घालून धुतलेले तांदूळ घालावे मग चांगले परतून घ्यावे. व अंदाजाने पाणी गरम करून घालावे. कुटलेला मसाला, मीठ, गुळ थोडा चवीला घालावा व खिचडी शिजवायला ठेवावी.
खिचडी शिजत आल्यावर वरतून थोडी हळद घालावी व हलक्या हाताने हलवावे वरतून थोडे पाणी शिंपडावे व परत मंद विस्तवावर खिचडी २-३ मिनिट शिजू द्यावी.
गरम गरम वाढावी वरतून कोथंबीर व खोवलेला नारळ घालावा.