चीज अंडा भुर्जी : आपण नेहमी अंडा भुर्जी बनवतो. त्यामध्ये चीज घालून बघा तुम्हाला नक्की आवडेल. चीज घातल्याने भुर्जीची चव पण सुंदर लागते. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला सुद्धा चांगली आहे.
चीज अंडा भुर्जी बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
४ अंडी
१ मोठा कांदा
१ छोटा टोमाटो
१ छोटी शिमला मिर्च
१ टी स्पून आले पेस्ट
१ टी स्पून लसून पेस्ट
२-३ हिरव्या मिरच्या
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हळद
१ टे स्पून दुध
१ चीज क्यूब
मीठ चवीने
१ टे स्पून तेल
कृती :
कांदा, टोमाटो, हिरवी मिरची, सिमला मिर्च बारीक चिरून घ्या. अंडी काटे चमचा घेवून फेटून घ्या.
एका कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, टोमाटो, शिमला मिर्च, आले-लसून पेस्ट घालून थोडे गुलाबी रंगावर परतून घ्या. मग त्यामध्ये मीठ, लाल मिरची पावडर, हळद, घालून मिक्स करून मग फेटलेले अंडे व किसलेले चीज घालून मिक्स करून कढई वर दोन मिनिट झाकण ठेवा. झाकण काढून परत भुर्जी हलवून घ्या.
गरम-गरम भुर्जी चपाती बरोबर सर्व्ह करा.
The English language version of this Anda Bhurji recipe is published in this – Article