डाळ ढोकळी Dal Dhokli : डाळ ढोकळी ही एक महाराष्टातील प्रसिद्ध डीश आहे. ही एक छान चमचमीत डीश आहे. कधी भाजी-चपाती अथवा डाळ-भात करायचा अथवा खायचा कंटाळा आला तर ही डीश बनवता येते. ह्यामध्ये गव्हाचे पीठ वापरले आहे त्यामुळे पौस्टिक तर आहेच.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य :
२५० ग्राम कणिक
१ कप तुरीची डाळ
१/४ कप हरभरा पीठ
२ टे स्पून नारळ (खोवून)
मीठ चवीने
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून गरम मसाला
फोडणी साठी
१ टे स्पून तेल
४-५ लसून पाकळ्या (बारीक करून)
१/४ टीस्पून हिंग
चिंच-गुळ चवीने
कोथंबीर
कृती : प्रथम तुरीची डाळ शिजवून घ्यावी. शिजल्यावर पाणी घालून थोडे पातळ करावी. त्यामध्ये मीठ, लाल मिरची पावडर, गरम मसाला, चिंच, गुळ, कोथंबीर, लसून घालून मिक्स करावे. गरम तेलाची फोडणी करून शिजवलेल्या डाळी मध्ये घालावी.
एका परातीत कणिक व चणादालीचे पीठ, मीठ, लाल मिरची पावडर, हळद, गरम मोहन घालून जशी आपण पोळी साठी कणिक मळतो तशी मळावी. त्याचे एकसारखे गोळे करून त्याच्या चपात्या लाटून त्याच्या शंकर पाळी सारखे तुकडे करावे. मग ते सगळे तुकडे शिजत असलेल्या डाळीमध्ये घालावे. डाळ थोडी पातळच करावी. मंद विस्तवावर ६-७ मिनिट शिजवावे.
गरम गरम सर्व्ह करावे. वरतून तूप घालावे. ह्या बरोबर तळलेला पापड किंवा लोणचे पण छान लागते.