गाजराचा साखरभात : गाजराचा साखरभात ही एक स्वीट डीश आहे. आपण नेहमीच साखरभात, अननस भात बनवतो. गाजराचा भात चवीला छान लागतो. दिसायला पण सुंदर दिसतो. त्यामध्ये गाजर व नारळ घातला आहे त्यामुळे ह्याची चव फारच सुंदर लागते.
साहित्य :
१ कप बासमती तांदूळ
१ कप गाजराचा कीस
१ १/२ कप साखर
३/४ कप नारळ (खोवून)
२ टे स्पून दुध
३ टे स्पून तूप
१ टी स्पून वेलचीपूड
कृती:
तांदूळ धुवून घ्यावेत, थोडे तूप घालून त्याचा मोकळा भात करून घ्यावा व थंड करायला ठेवावा. एका कढईत अ टी स्पून तूप गरम करून गाजराचा कीस परतून घ्या व बाजूला ठेवा. तसेच नारळ सुद्धा तुपावर परतून घ्या. मग एका जाड बुडाच्या भांड्यात नारळ, साखर व दुध घालून मिक्स करावे. मग त्यामध्ये शिजवलेला भात घालावा व भातावर ३-४ चमचे तूप सोडावे व भात मिक्स करून घ्यावा व गाजराचा कीस घालून मिक्स करून मंद विस्तवावर भात गरम करून घ्यावा.
गाजराचा भात झाल्यावर वेलचीपूड घालून मिक्स करावे. वरतून सुकामेवा घालून सजवावे.