गवारची भाजी : गवारची भाजी बनवता गवार नेहमी कोवळी घ्यावी म्हणजे भाजी फार स्वदिस्ट होते.
ही भाजी बनवताना फोडणीमध्ये लसून घालावा त्यामुळे भाजीचा स्वाद अजून वाढतो. गवार ही मधुर, शीतल, पौस्टिक, पित्तहारक व कफकारक आहे. ही गवारची भाजी महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवली आहे.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
२५० ग्राम गवार
१ मोठ्या आकाराचा कांदा
१/४ कप कोथंबीर
२ टे स्पून शेंगदाणे कुट
२ टे स्पून नारळ (खोवून)
१ टी स्पून साखर
मीठ चवीने
फोडणी साठी
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून हळद
६-७ लसून (ठेचून)
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून गरम मसाला
कृती : प्रथम गवारच्या भाजीचे वरचे व खालचे देठ काढून शिरा काढाव्यात मग हाताने मोडून घावी. तसेच धुवून घावी. शेगदाणे भाजून त्याची साले काढून त्याचा कुट बनवावा. लसून ठेचून घ्यावा.
एका काढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, लसून घालून मग त्यामध्ये कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्यावा मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, मीठ घालून गवार घालावी व त्यामध्ये एक कप पाणी घालावे व मिक्स करून कढई वर झाकण ठेवावे झाकणावर थोडे पाणी घालून गवारची भाजी मंद विस्तवावर शिजवून घ्यावी. भाजी शिजल्यावर शेंगदाणे कुट व कोथंबीर घालावी. चवीला थोडी साखर घालावी. ही भाजी थोडी रश्याची बनवावी म्हणजे छान लागते.
गरम गरम भाजी चपाती बरोबर सर्व्ह करावी.
This English version of the Gawar Bhaji is published in this – Article