कांद्याच्या पातीची पीठ पेरून भाजी : (Spring Onion) कांद्याच्या पातीची भाजी ही महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवली आहे. ह्यामध्ये बेसन वापरले आहे. त्यामुळे भाजी खमंग लागते. ही भाजी थोडी कोरडी आहे त्यामुळे मुलांना डब्यामध्ये द्यायला छान आहे. ह्या भाजी साठी कांद्याची पात कोवळी वापरावी. म्हणजे भाजी फार सुरेख लागते.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: २ जणासाठी
साहित्य :
२ कप कांद्याची पात (चिरलेली)
१/४ कप पातीचा कांदा (चिरून)
४-५ लसून (ठेचून)
१ हिरवी मिरची (बारीक चिरून)
२ टे स्पून बेसन
मीठ चवीने
१ टे स्पून नारळ
फोडणी साठी
१/२ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून हळद
१/४ टी स्पून हळद
१/२ टी स्पून लाल मिरची पावडर
कृती :
एका कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, चिरलेला कांदा, हिरवी मिरची घालून मंद विस्तवावर दोन मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, मीठ, चिरलेली कांदा पात व दोन टे स्पून पाणी घालून मिक्स करा. कढई वर झाकण ठेवा व मंद विस्तवावर भाजी पाच-सात मिनिट शिजू द्या.
कढई वरची प्लेट काढून त्यामध्ये बेसन मिक्स करा व भाजी मंद विस्तवावर दोन-तीन मिनिट शिजवून घ्या.
गरम गरम भाजीवर खोवलेला नारळ घालून चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करा.
The English language version recipe of the Kandyachya Patichi Peeth Perun Bhaji is published in this – Article