खजुराचे मोदक : खजूर हा पौस्टिक आहे. लहान मुले नुसता खजूर खात नाहीत जर त्याचे मोदक बनवले तर त्यांना नक्की आवडतील. तसेच ह्यामध्ये खस-खस, सुके खोबरे, ड्राय फ्रुट आहे त्यामुळे पण चव छान येते. खजुराचा जेव्हा सीझन असतो किंवा थंडीच्या दिवसात ह्याचे मोदकाच्या आकाराचे किंवा सामोस्याच्या आकाराचे बनवावेत.
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १५ मोदक बनतात
साहित्य : सारणासाठी :
२०० ग्राम खजूर
२ टे स्पून सुका नारळ (किसून)
१/२ टे स्पून खस-खस
१ टे स्पून ड्राय फ्रुट पावडर
१ टी स्पून वेलचीपूड
आवरणासाठी :
१ कप मैदा
१/२ कप रवा
१ टे स्पून गरम तेल
मीठ चवीने
तळण्यासाठी तूप
कृती :
सारणासाठी : खजूर स्वच्छ धुवून त्याच्या बिया काढून एका पेपरवर १०-१५ मिनिट पसरवून ठेवा. मग मिक्सरमध्ये ग्राईड करा. खस-खस व सुके खोबरे थोडे भाजून घ्या. मग वाटलेला खजूर, खस-खस, खोबरे, ड्राय फ्रुट, वेलचीपूड, घालून मिक्स करा.
आवरणा साठी : रवा, मैदा, मीठ व गरम तेलाचे मोहन घालून पीठ घट्ट मळून घ्या. मग १०-१५ मिनिटानी त्याचे लिंबा एव्ह्डे गोळे करून पुरी सारखे लाटून त्यामध्ये एक टे स्पून सारण भरून पुरी एकदा मुडपून मध्ये दाबावी मग परत एकदा मुडपून परत दाबावी म्हणजे चित्रामध्ये जसा आकार आहे तसा आकार येईल.
कढई मध्ये तूप गरम करून मोदक छान कुरकुरीत तळून घ्यावे.