चॉकलेट मोदक (Chocolate Modak) – प्राथमिक कृतीसाठी ही पध्दत बघा – Chocolate Making Procedure
मोदक म्हटले की गणपती बापांचे अगदी आवडीचे. तसेच आपणा सर्वाना सुद्धा आवडतातच. चॉकलेट मोदक हे वेगवेगळ्या प्रकारचे बनवता येतात. ह्यामध्ये एका वेळेस दोन बेस वापरून दोन रंगामध्ये करता येतात. ह्या मध्ये आपल्याला डार्क बेस व व्हाईट बेस, मिल्क बेस व व्हाईट बेस, डार्क बेस, मिल्क बेस असे वापरता येईल.चॉकलेट मोदक हे दिसायला पण खूप सुंदर दिसतात. परत त्यामध्ये वेगवेगळे बेस वापरले तर चवीला पण चांगले लागतात. चॉकलेट मोदक हे बनवायला खूप सोपे आहेत व लवकर (झटपट) होणारे आहेत.
An English language version of the Chocolate Modak recipe id published in this – Article
चॉकलेट मोदक बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४० मोदक
साहित्य :
२५० ग्राम चॉकलेट डार्क बेस
२५० ग्राम मिल्क बेस अथवा व्हाईट बेस,
मोजकाच्या आकाराचा मोल्ड
कृती :
चॉकलेट डार्क बेस, मिल्क बेस व व्हाईट बेस घेवून तीनही वेगवेगळे डबल बाँयलिंग पद्धतीने विरघळवून घ्यावा. मग एका चमच्यानी हलवून घेवून ५ मिनिट थंड करायला बाजूला ठेवावा. मग मोदकाचा मोल्ड घेवून मोल्डमध्ये प्रथम डार्क बेस मग व्हाईट बेस्ट असे घालावे. मग मोल्ड फ्रीझमध्ये पाच मिनिट ठेवून मग काढावा.