चॉकलेट डेअरी मिल्क ही बनवायला अगदी सोपी आहे. मुलांच्या वाढदिवसाला घरी पटकन बनवता येईल.
चॉकलेट डेअरी मिल्क (Dairy Mail) – प्राथमिक कृतीसाठी ही पध्दत बघा – Chocolate Preparation Method
साहित्य :
डार्क चॉकलेट बेस किंवा मिल्क चॉकलेट बेस (बेस आपल्याला जेव्हडी आवशकता आहे तेव्हडा घ्यावा.)
मोल्ड
कृती :
चॉकलेट बेस घेवून डबल बाँयलिंग पद्धतीने विरघळवून घ्यावा. मग एका चमच्यानी हलवून घेवून ५ मिनिट थंड करायला बाजूला ठेवावा. मोल्ड घेवून त्यामध्ये चमच्यानी बेस घालून, मोल्ड सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये पाच मिनिट ठेवावा. पाच मिनिट झाल्यावर मोल्ड फ्रीज मधून काढून त्यातील चॉकलेट बटर पेपर वर काढून ठेवावीत मगच त्याला नंतर पेपरमध्ये गुंडाळून घ्यावीत.