चॉकलेट किट- कँट ह्यामध्ये वेफर बिस्कीट वापरले आहे. त्यामुळे खातांना मधेच बिस्किटाची कुर-कुरीत चव येते त्यामुळे छान लागते. चॉकलेट किटकँट (Kit Kat) – प्राथमिक कृतीसाठी ही पध्दत बघा – Chocolate Making Method
साहित्य :
मिल्क चॉकलेट बेस, वेफर बिस्कीट, मोल्ड
कृती :
चॉकलेट बेस घेवून डबल बाँयलिंग पद्धतीने विरघळवून घ्यावा. मग एका चमच्यानी हलवून घेवून ५ मिनिट थंड करायला बाजूला ठेवावा. मोल्ड घेवून त्यामध्ये चमच्यानी अगोदर थोडा बेस घालून त्यावर मोल्ड च्या आकाराचे वेफर बिस्कीट ठेवून परत तयार बेस घालून मग मोल्ड सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये पाच मिनिट ठेवावा. पाच मिनिट झाल्यावर मोल्ड फ्रीज मधून काढून त्यातील चॉकलेट बटर पेपर वर काढून ठेवावीत मगच त्याला नंतर पेपरमध्ये गुंडाळून घ्यावीत.