मश्रूम पुलाव : Mushroom Pulao/Rice/Bhaat मश्रूम पुलाव हा चवीला अगदी उत्कृष्ट लागतो. मश्रूम किती पौस्टिक आहेत हे आपल्याला माहीत आहेत. मश्रूम घालून पुलावाला एक वेगळी टेस्ट येते. ह्या बरोबर रायता किंवा भजी केली तर दुसरे काही नाही केले तरी चालते.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४-५ जणासाठी
साहित्य :
२ कप बासमती तांदूळ
२ कप मश्रुमचे तुकडे
१ छोटा कांदा (चिरून)
१ छोटा टोमाटो (चिरून)
१ लिंबू रस, मीठ चवीने
४ १/४ कप गरम पाणी
मसाला १ :
१/२ कप कोथंबीर
७-८ लसून, १” आले
२ हिरव्या मिरचा
१ टी स्पून बडीशेप
१ टी स्पून शहाजिरे
थोडे पाणी घालून मसाला बारीक वाटून घ्या.
मसाला २ :
१ कप खोबरे
१ टी स्पून तेल
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून धने-जिरे पावडर व थोडे पाणी घालून मसाला जाडसर वाटून घ्या.
(कढईमध्ये तेल गरम करून नारळाचा वाटलेला मसाला पाच मिनिट भाजून घ्या. नंतर त्यामध्ये टोमाटो व मश्रूम चे तुकडे घालून दोन मिनिट परतून घ्या.)
फोडणी :
१ टे स्पून तेल
२ तमल पत्र
३ लवंग
४-५ मिरे
कृती :
तांदूळ धुवून बाजूला ठेवा. कुकरमध्ये तेल गरम करून तमलपत्र, लवंग, मिरे घालून कांदा परतून घ्या व त्यामध्ये तांदूळ घालून दोन मिनिट परतून घ्या. हिरवा मसाला घालून दोन-तीन मिनिट परतून घ्या. नंतर त्यामध्ये खोबरे मसाला, गरम पाणी, मीठ, लिंबू रस, घालून दोन शिट्या द्या.
गरम गरम सर्व्ह करा.
An English language version of a similar Mushroom Rice recipe is published in this – Article
The video of the same Mushroom Pulao/ Rice/ Bhat recipe in Marathi can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=WOVaJvO5AXE