नारळ तांदळाची खीर : (Coconut- Rice Kheer) नारळ तांदळाची खीर ही श्रावण महिन्यात नारळी पौर्णिमेला करता येते. ह्या खिरीमध्ये तांदूळ हा बासमती किंवा आंबेमोहर वापरावा म्हणजे खिरीची चव चांगली लागते. खिरीमध्ये नारळ थोडा भाजून घातल्याने खमंग लागते. नारळ-तांदूळ खीर ही महाराष्ट्रीयन लोकांची आवडती व प्रसिद्ध खीर आहे. ही खीर पुरी बरोबर सर्व्ह करता येते.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: ३४ जणासाठी
साहित्य :
१/४ कप तांदूळ (बासमती किंवा आंबेमोहर)
१/४ टे स्पून ओला नारळ (खोवून)
१/२ लिटर दुध
१/२ कप साखर
१ टे स्पून साजूक तूप
१ टी स्पून वेलचीपूड
१ टे स्पून बदाम-काजू तुकडे
४-५ केसर काड्या
कृती :
तांदूळ धुवून १५ मिनिट सुकवत ठेवा. नंतर मिक्सरमध्ये थोडे बारीक वाटून घ्या. नारळ सुद्धा मिक्सरमध्ये थोडासा वाटून घ्या.
कढई मध्ये तूप गरम करून मंद विस्तवावर तांदूळ गुलाबी रंगावर भाजून घ्या. त्यामध्ये नारळ घालून २-३ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. मग त्यामध्ये १/२ कप दुध घालून २-३ मिनिट मंद विस्तवावर तांदूळ शिजवून घ्या. नंतर राहिलेले दुध व साखर घालून मिक्स करून ५-७ मिनिट उकळून घ्या. मग त्यामध्ये वेलचीपूड, बदाम-काजू तुकडे, केसर घालून मिक्स करून १-२ मिनिट गरम करून घ्या. सर्व्ह करतांना गुलाब पाकळ्यानी सजवा.
गरम गरम खीर पुरी बरोबर सर्व्ह करा.
The English language of the Naral Tandalachi Kheer can be seen in this – Article