अननसाचे चॉकलेट (Pineapple Chocolate) – प्राथमिक कृतीसाठी ही पध्दत बघा – Basic Chocolate Preparation Method
अननसाचे चॉकलेट ह्या मध्ये अननसाचा ईसेन्स वापरला आहे त्यामुळे चव खूप छान लागते. हिरव्या रंग व व्हाईट बेस ह्यामुळे चॉकलेट अगदी अननसा सारखे दिसते.
अननसाचे चॉकलेट बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४० चॉकलेट
साहित्य :
५०० ग्राम व्हाईट बेस
खाण्याचा हिरवा रंग २ थेंब
अननसाचा ईसेन्स २-३ थेंब
अननसाच्या आकाराचा मोल्ड
कृती :
चॉकलेट बेस घेवून डबल बाँयलिंग पद्धतीने विरघळवून घ्यावा. मग एका चमच्यानी हलवून घेवून ५ मिनिट थंड करायला बाजूला ठेवावा. त्यामध्ये अननसाचा ईसेन्स घालून हलक्या हातानी हलवावे मग हिरवा रंग घालून हलक्या हातानी एकदाच फिरवावे म्हणजे मार्बलच्या टाईल सारखे दिसेल. मोल्ड घेवून त्यामध्ये चमच्यानी बेस घालून मोल्ड फ्रीजमध्ये ५ मिनिट ठेवावा. मग काढून घ्या.