ऋषीपंचमीची भाजी Rishipanchami Bhaji: गणेशचतुर्थी च्या दुसऱ्या दिवशीचा जो दिवस असतो त्याला ऋषीपंचमीचा दिवस म्हणतात. ह्या दिवशी मुद्दाम ही ऋषीची भाजी केली जाते. ही भाजी चवीला खूप छान लागते. महाराष्ट्रामध्ये ही भाजी लोकप्रिय आहे.
साहित्य :
१/४ कप दोडका (चिरून)
१/४ कप काकडी (चिरून)
१/४ कप पडवळ (चिरून)
१/४ भेंडी (चिरून)
१/४ कप टोमाटो (चिरून)
१/४ कप मक्याचे कोवळे दाणे
१/४ कप ओळी चवळी
३-४ हिरव्या मिरच्या (चिरून)
१/२ कप कोथंबीर
१/४ कप नारळ (खोवून)
मीठ चवीने
२ टे स्पून लोणी
कृती :
सर्व भाज्या धुवून चिरून घ्या.
एका कढईमधे लोणी गरम करून त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालून सर्व भाज्या घालून मिक्स करा. मग त्यामध्ये चवीने मीठ, कोथंबीर, नारळ घालून मिक्स करून घ्या. कढई वरती झाकण ठेवा व झाकणावर पाणी ठेवा. मंद विस्तवावर भाजी ठेवून वाफेवर शिजवून घ्या. भाजी शिजण्यासाठी भाजी मध्ये पाणी घालून नये कारण ह्या भाजी मध्ये भेभेंडी घातली आहे, पाणी घातलेतर भेंडी चिकट होईल व भाजी बरोबर लागणार नाही.
ऋषीपंचमीची भाजी ही नुसती खायला पण छान लागते.