शेपूची भाजी : (Shepuchi Moong Dal Bhaji) Dill leaves in English and Savaa/Suva in Hindi- शेपूची भाजी ही चवीला खूप छान लागते. ही भाजी महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवली आहे.
साहित्य :
३ कप शेपू बारीक चिरून
१/४ कप मुग डाळ
१ मध्यम आकाराचा कांदा
१ टे स्पून नारळ खोवलेला
मीठ चवीने
फोडणी साठी :
१/२ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
५-६ लसून पाकळ्या (ठेचून)
२ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
कृती : मुग डाळ १ तास भिजून ठेवा. शेपू भाजी धुवून बारीक चिरून घ्या.
कढई मध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, लसून, कांदा घालून २ मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये मीठ, भिजवलेली डाळ, चिरलेला शेपू, १/४ कप पाणी घालून मिक्स करून कढई वर झाकण ठेवून भाजी ८-१० मिनिट मंद विस्तवावर शिजू द्या, मग त्यामध्ये खोवलेला नारळ घालून मिक्स करून भाकरी वा चपाती बरोबर सर्व्ह करा.
The English language version of the Shepu Vegetable Preparation is published in this – Article