शेपूची भाजी – २ : (Shepu Shengdana Bhaji) शेपूची भाजी ही शेगदाणे कुट घालून खूप छान लागते. ही भाजी महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवली आहे. शेपूच्या भाजी मध्ये शेगदाणे कुट च्या आयवजी मुग डाळ घालून सुद्धा ही भाजी छान लागते. ही भाजी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर छान लागते.
शेपूची भाजी बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: २ जणासाठी
साहित्य :
१ लहान शेपूची जुडी
१ मध्यम आकाराचा कांदा
२ टे स्पून शेगदाणे कुट
१ टे स्पून नारळ (खोवून)
मीठ चवीने
फोडणी साठी :
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
६-७ लसून पाकळ्या (ठेचून)
कृती : शेपूची भाजी धुवून बारीक चिरून घ्यावी. शेगदाणे भाजून सोलून थोडे जाडसर कुटावेत.
कढई मध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, लसून घालून कांदा, हिरवी मिरची घालून २-३ मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये मीठ, चिरलेला शेपू व १/२ कप पाणी घालून भाजी मंद विस्तवावर शिजवून घ्यावी मात्र कोरडी करू नये थोडी ओलसरच ठेवावी. मग त्यामध्ये शेगदाणे कुट व नारळ घालून मिक्स करून भाकरी बरोबर सर्व्ह करावी.
The English language version of the Shepu Peanuts Vegetable Preparation is published in this – Article