शाही सरंगा : (Stuffed Fried Black Pomfret) सरंगा म्हणजे काळा पॉपलेट आहे. हा मासा चवीला फार टेस्टी लागतो. महाराष्ट्रातील कोकणी लोकांचा हा फार आवडता मासा आहे. कोकणी लोकांची आवडते जेवण म्हणजे डाळीची आमटी, गरम-गरम भात व तळलेला सरंगा मासा. ह्या माशाला काजू, बदाम, पिस्ते, ओला नारळ वापरून भरलेले आहे त्यामुळे एक वेगळीच चव आली आहे.
साहित्य :
१ मोठ्या आकाराचा मासा
१/२ टी स्पून हळद
मीठ चवीने
२ मध्यम बटाटे
२-३ हिरव्या मिरच्या
२ कप कोथंबीर (चिरून)
५-६ लसूण पाकळ्या
१/२ कप काजू, बदाम, पिस्ते
१/४ कप ओले खोबरे
१०-१२ बेदाणे
तेल तळण्यासाठी
कृती :
भरलेला सारंगा मासा करण्यासाठी त्याचे पोट चिरून मग चांगले साफ करून, धुवून त्याला हळद, मीठ चोळून ठेवावे. बटाटे उकडून, सोलून त्याच्या चकत्या कराव्यात व ह्या बटाट्याच्या चकत्याना मीठ-मिरची लावून ते सारंग्याच्या पोटात भरावे.
कोथंबीर बारीक चिरावी, लसून पाकळ्या उभ्या चिराव्यात, काजूचे तुकडे, बदाम, पिस्ते, यांचे काप करून त्यामध्ये ओला नारळ, बेदाणे, व मीठ हे सर्व मिक्स करावे. व हे मिश्रण सरंगाच्या पोटात बटाट्याच्या चकत्या ठेवल्या आहेत त्यावर पसरवावे. मग सरंगा मासा दोऱ्याने बांधून घ्यावा मग नॉनस्टिक तव्यावर फ्राय करून घ्या किंवा ओव्हनमध्ये भाजून घ्यावा.