सुरमई माशाचे कबाब : सुरमई माशाचे कबाब हे जेवणा अगोदर सर्व्ह करता येतात किंवा जेवणा बरोबर सुद्धा सर्व्ह करता येतात. हे कबाब अगदी हॉटेल प्रमाणे होतात.ही अगदी वेगळी रेसिपी आहे. परत ह्यामध्ये तेलाचा काही वापर केलेला नाही त्यामुळे पण वेगळी चव लागते.
बनवण्याचा वेळ: ६० मिनिटे
वाढणी: ४ जण
साहित्य :
५०० ग्राम सुरमई मासा (साफ करून त्याचे छोटे तुकडे करा)
माशाच्या तुकड्यांना मीठ, लिंबू लाऊन एक तास बाजूला ठेवा.
हिरवा मसाला : मिक्सर मध्ये वाटणे
२ कप कोथंबीर (बारीक चिरून)
४ हिरव्या मिरच्या
१/४ कप पुदिना पाने (चिरून)
७-८ लसून पाकळ्या
१ १/२” आले तुकडा
१ टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
नारळाची चटणी
(दही सोडून सर्व मसाला वाटून घ्यावा मग दही मिक्स करावे)
१/२ कप खोवलेला नारळ
६-७ हिरव्या मिरच्या
१ टी स्पून लाल मिरची पावड
मीठ चवीने
१ टी स्पून दही (घट्ट)
कृती :
मीठ व लिंबू लावून ठेवलेले माशाचे तुकडे घ्या व जास्तीचे पाणी काढून टाका. प्रतेक तुकड्याला एका बाजूनी हिरवी चटणी व दुसऱ्या बाजूनी नारळाची चटणी लावून घ्या. मग सर्व तुकडे एका सिल्वर फॉईल पेपर मध्ये गुंडाळा.
ओव्हन गरम करून ग्रील वरती १५ मिनिट बेक करा मग परत उलट करून १५ मिनिट बेक करा.
गरम गरम सर्व्ह करा. सर्व्ह करतांना सिल्वर फॉईल पेपर काढून माशाच्या तुकड्यान वर गरम मसाला भुरभुरा व तुपाचे पण काही थेब टाका.
The English language version of the Surmai Kabeb preparation is published in this – Article