Gauri – Hartalika [ Mahalaxmi] Pujan आज हरतालिका आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आगोदर हरतालिकाची पूजा स्त्रिया मनोभावे करतात. ही पूजा सकाळी केली जाते. ही पूजा लग्न न झालेल्या मुली चांगला पती मिळावा म्हणून अगदी श्रद्धेनी करतात. महाराष्ट्रातील स्त्रिया ह्या दोन्ही पूजा आवर्जून करतात.
आपल्याला जेथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून त्यावर चौरंग ठेवावा त्याच्या भोवती रांगोळी काढावी. मग चौरंगावर सखी-पार्वतीच्या मूर्ती व गणपतीची देव्हाऱ्यातील मूर्ती किंवा गणपती म्हणून सुपारी ठेवून, हळद-कुंकू लावावे, आघाडा, दुर्वा व फुले व्हावीत, पाच फळे ठेवावीत, तुपाचा दिवा, धूप लावून गणपतीची व हरतालिकेची आरती म्हणावी. संपूर्ण दिवस उपवास करून फक्त फळे, दुध, रताळी खावीत व दुसऱ्या दिवशी उपवास सोडवा. ह्या दिवशी रात्री मुली मगच सखी-पार्वतीची मूर्ती विसर्जित करावी. रात्री मुली व स्त्रिया जागरण करतात व देवाची गाणी व झिमा-फुगडी खेळून मनोभावे पूजा करतात.
गौरी पूजन म्हणजेच महालक्ष्मी पूजन ह्या गौरी गणपती स्थानापन्न झाल्यावर तिसऱ्या दिवशी घरी आणतात. पूर्वीच्या काळी स्त्रिया गौरी पूजनासाठी नदीवर अथवा पाणवठ्यावर जावून पाणी आणत होत्या ह्याच्या मागे त्याच्या हेतू होता की आपले पाण्याचे स्त्रोत शुद्ध राहिले पाहिजे तसेच पाणी काटकसरीने वापरल पाहिजे.
आता कालांतराने पद्धत बदलत चालली आहे. स्त्रियाना आपल्या कामा निमित घराबाहेर रहावे लागते. त्या तारेवरची कसरत करून मनोभावे महालक्ष्मीचे आगमन, नेवेद्य, इतर स्त्रीयांना बोलवून हळदी-कुंकू अगदी हौशीने करतात व आपल्या कुटुंबासाठी, घरासाठी संपन्नता, सुखशांती साठी आराधना करतात.
For Ganapati-Gauri Puja see this – Article