बटाट्याची उपासाची भाजी : बटाट्याची उपासाची भाजी ही महाराष्ट्रीयन पद्धतीची लोकप्रिय भाजी आहे. ही भाजी उपासाच्या दिवशी अगदी हमखास बनवली जाते. ह्या भाजीला खोवलेल्या नारळाचे वाटण लावले आहे त्यामुळे चव सुंदर लागते. वरयाच्या पिठाच्या डोश्या बरोबर ही भाजी छान लागते. उपासाचा मसाला डोसा म्हणता येईल.
बटाट्याची उपासाची भाजी बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
३ मोठ्या आकाराचे बटाटे
१ टे स्पून लिंबू रस
मीठ व साखर चवीने
भाजीसाठी मसाला (थोडा जाडसर वाटून)
१/४ कप नारळ (खोवलेला)
२-३ हिरव्या मिरच्या
२ टे स्पून कोथंबीर (बारीक चिरून)
१/२ टी स्पून जिरे
मीठ अगदी थोडेसे
फोडणी साठी :
१ टे स्पून तेल
१ टी स्पून तूप
१/२ टी स्पून जिरे
कृती :
बटाटे उकडून सोलून कापून घेवून त्याला लिंबू रस, मीठ व साखर लावून ठेवा. नारळ, कोथंबीर, मिरची जिरे थोडे जाडसर मिक्सरमध्ये वाटून घ्या.
काढई मध्ये तेल व तूप गरम करून त्यामध्ये जिरे घालून वाटलेला हिरवा मसाला एक मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये बटाटे घालून भाजी चांगली परतून घ्या.
ही भाजी उपासाच्या दिवशी नुसती खायला पण छान लागते किंवा वरयाच्या पिठाच्या डोश्या बरोबर पण छान लागते.
The English language version of the Batatyachi Upasachi Bhaji Recipe is published in this – Article