चॉकलेट ट्रफल्स Chocolate Truffles – प्राथमिक कृतीसाठी ही पध्दत बघा. – Basic Chocolate preparation method
चॉकलेट म्हंटले की लहान मुलांना व सगळ्याच जणांना आवडतात. चॉकलेट ट्रफल्स हे लहान मुलांच्या वाढदिवसाला बनवता येतील. ह्या चॉकलेटमध्ये डेसीकेटेड कोकनट वापरले आहे त्यामुळे छान नारळाची चव येते व ओरीओ बिस्कीट चुराचा आहे त्यामुळे व चॉकलेची चव अप्रतीम लागते. तसेच वरतून डेसिकेटेड कोकनट लावल्याने चॉकलेट ट्रफल्स खूप छान पण दिसतात.
चॉकलेट ट्रफल्स बनवण्यासाठी लागणारा वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४० चॉकलेट
साहित्य :
५०० ग्राम डार्क चॉकलेट बेस
१/२ कप डेसीकेटेड कोकनट,
१० ओरीओ बिस्कीट (चुरा)
बडीशेप गोळ्या किंवा डेसिकेटेड कोकनटने सजवा
कृती :
चॉकलेट बेस घेवून डबल बाँयलिंग पद्धतीने विरघळवून घ्यावा. मग एका चमच्यानी हलवून घेवून ५ मिनिट थंड करायला बाजूला ठेवावा. त्यामध्ये डेसीकेटेड कोकनट व ओरीओ बिस्कीट चुरा घालून मिक्स करून घेवून त्याचे छोटे-छोटे गोळे (balls) बनवून घ्या. एका प्लेटवर बटर पेपर ठेवून त्यावर हे गोळे ठेवा. ह्या गोळ्यांना बडीशेपच्या गोळ्यांनी सजवता येईल. मग ही प्लेट पाच मिनिट साठी फ्रीजमध्ये ठेवून मग काढा व पेपरमध्ये गुंडाळून घ्या.