कॉकटेल चीज बिस्कीट – Cocktail Cheese Biscuit हा पदार्थ जेवणाच्या आगोदर प्रारंभिक पदार्थ म्हणून घेता येईल. चीज बिस्कीट हे बनवायला अगदी सोपे व लवकर होणारे आहेत. हे पौस्टिक सुद्धा आहेत कारण ह्यामध्ये चीज, टोमाटो, कांदा, काकडी आहे.
The English language version of the Cocktail Biscuit is published in this – Article
साहित्य :
१ खारी बिस्कीट पुडा
२ स्लाईस चीज (१” तुकडे करून)
१ लहान आकाराचा टोमाटो
१ लहान काकडी
१ लहान कांदा, पुदिना पाने
मिरी पावडर व चाट पावडर
कृती :
एका स्लाईस चीजचे १” चे तुकडे करा. टोमाटो च्या पातळ गोल-गोल चकत्या कापा. काकडी सोलून त्याच्या गोल- गोल चकत्या कापा. कांदा सोलून त्याचे गोल-गोल चकत्या कापा.
एका प्लेट मध्ये खारी बिस्कीट मांडून घ्या. त्यावर प्रथम कांदा चकती, काकडी चकती, टोमाटो चकती त्यावर चीज चा तुकडा ठेवा वरतून मिरी पावडर, चाट मसाला भूर भुरा व पुदिना पाने ठेवून सजवा.