बीटरूट वडी (Beetroot Naral Barfi) : बीटरूट वडी एक स्वीट डीश आहे. ह्या वड्या चवीला अगदी उत्कृष्ट लागतात व दिसायला सुंदर दिसतात. ह्या मध्ये नारळा बरोबर बीटरूट उकडून घातले आहे. त्यामुळे चवीला छान लागतात.
बीटरूट वडी बनवण्यासाठी लागणारा वेळ – ३० मिनिट
वाढणी – २० वड्या
साहित्य :
२ कप नारळ खोवलेला
२ कप दुध
१ कप बीटरूट
१ १/२ कप साखर
१ टी स्पून वेलचीपूड
१ टे स्पून काजू बदाम जाडसर पावडर
१ टे स्पून पिठीसाखर
१ टी स्पून तूप
कृती :
प्रथम बीटरूट धुवून थोडे उकडून, सोलून मग किसून घ्यावे. एका स्टीलच्या प्लेटला १ टी स्पून तूप लावून ठेवावे.
एका कढई मध्ये नारळ, दुध व किसलेले बीटरूट मिक्स करून आटवत ठेवा. निम्मे आटवून झाले की साखर मिक्स करून थोडे कोरडे होईस तोवर मंद विस्तवावर आटवून घेवून त्यामध्ये वेलचीपूड, काजू-बदाम, पिठीसाखर घालून चांगले हलवून घ्या मग तूप लावलेल्या प्लेटमध्ये एक सारखे थापून घेवून मग त्याच्या वड्या कापा.
The English language version of the Coconut Beetroot Barfi Recipe is published in this – Article