दडपे पोहे : पोहे ही एक महाराष्ट्रातील लोकप्रिय डीश आहे. दडपे पोहे ही एक नाश्त्याला किंवा दुपारी चहा बरोबर करता येते. दडपे पोहे हे चवीला खूपच चवीस्ट लागतात. ह्यामध्ये पातळ पोहे वापरले आहेत त्यामुळे चिवट होत नाहीत. नारळ व नारळाचे पाणी घातल्याने सुंदर लागतात. दडपे पोहे कमी वेळात बनवता येतात व वरतून फोडणी घातल्यामुळे ते खमंग लागतात.
दडपे पोहे बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: २ जणासाठी
साहित्य :
२ कप पातळ पोहे
१ कप नारळ खोवून
१ टे स्पून भाजलेले शेगदाणे
१ लिंबू रस
१/४ कप कोथंबीर (बारीक चिरून)
३-४ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
१ छोटा कांदा (बारीक चिरून)
मीठ व साखर चवीने
फोडणी साठी :
१/२ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१/४ टी स्पून हिंग
७-८ कडीपत्ता
![Maharashtrian Dadpe Pohe](https://www.royalchef.info/wp-content/uploads/2015/09/Dadpe-Pohe-300x225.jpg)
कृती :
एका भांड्यात पातळ पोहे व खोवलेला नारळ मिक्स करून १० मिनिट बाजूला ठेवा. मग त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथंबीर घालून नारळाचे पाणी असेल तर थोडे घालावे, मीठ, साखर, लिंबू, भाजलेले शेगदाणे, हिरव्या मिरच्याचे तुकडे घालून हलक्या हाताने मिक्स करावे.
एका फोडणीच्या कढई मध्ये तेल गरम करून मोहरी, हिंग व कडीपत्ता घालून फोडणी तयार करून पोह्यावर घालावी. नंतर मिक्स करून १० मिनिट झाकून ठेवावे व नंतर खाण्यास द्यावे.
दडपे पोहे फार वेळ अगोदर करून ठेवू नये नाहीतर त्याची चव बदलते.
The English language version of the Dadpe Pohe recipe is published in this – Article