परतलेले सुकट – Small Dried Fish-Small Prawns: सुकट एक वाळवलेले काड (म्हणजे अगदी छोटे झिंगे) होय. हे परतलेले सुकट चवीला खूप टेस्टी लागतात. महाराष्टातील कोकणी लोकांची आवडती डीश आहे. हे सुकट बनवायला सोपे आहेत. तसेच अगदी कमी वेळात झटकन बनवता येतात. हे चटणी सारखे तोंडी लावायला छान आहे. फार अगोदर बनवून ठेवू नयेत.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: २ जणासाठी
साहित्य :
२ कप सुकट
१ टे स्पून तेल
१/४ टी स्पून हळद
१ टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
सजावटीसाठी कोथंबीर
कृती :
प्रथम सुकट निवडून घ्या. एका कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हळद, मीठ, लाल मिरची पावडर घालून लगेच सुकट घालून २ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या.
परतलेले सुकट जेवणाच्या वेळेस बनवावे म्हणजे छान कुरकुरीत राहतात.
The English language version of the Crispy and Tasty Dry Roasted Sukat is published in this – Article