हिरव्या पानांची माठाची – Green Amaranth भाजी : हिरव्या पानांची माठाची भाजी हे एक पालेभाजी आहे. चवीला चांगली लागते. ही भाजी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर छान लागते.
हिरव्या पानांची माठाची – Green Amaranth भाजी:३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
१ जुडी हिरव्या पानांची माठाची भाजी
मीठ चवीने
२ टे स्पून शेंगदाणे कुट
२ टे स्पून नारळ (खोवलेला)
फोडणी साठी :
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
१ मध्यम आकाराचा कांदा (बारीक चिरून)
५-६ लसूण पाकळ्या (ठेचून)
१/४ टी स्पून हळद
कृती :
प्रथम माठाची भाजी निवडून धुवून चिरून घ्यावी.
एका कढईमध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग कांदा व लसूण घालून थोडे परतून घ्यावे. मग त्यामध्ये हळद, मीठ घालून चिरलेली भाजी घालावी व १/२ कप पाणी घालून कढई वर झाकण ठेवून मंद विस्तवावर भाजी शिजू द्यावी. भाजी शिजल्यावर त्यामध्ये शेगदाणे कुट व खोवलेले खोबरे घालून भाजी थोडी परतून घ्यावी. गरम गरम भाजी भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर सर्व्ह करावी.
The English language version of the Green Amaranth vegetable preparation is published in this – Article