बगारा बैंगन : बगारा बैंगन ही भाजी म्हणजे हैदराबाद येथे प्रसिद्ध आहे, पण ती आता महाराष्ट्रात सुद्धा प्रसिद्ध आहे. ही भाजी चवीला अतिशय चवीस्ट लागते. घरी पार्टीला करायला फार छान आहे. चपाती/पराठा बरोबर किंवा फ्राईड राईस बरोबर चांगली लागते.
The English language recipe of the Bhagara Baingan preparation if given in this – Article
साहित्य :
६ लहान गोल वांगी
१/४ कप चिंचेचा कोळ
१/२ कप तेल
मीठ व गुळ चवीने
१/२ कप कोथंबीर
मसाला करीता :
१ मोठा कांदा
४ लाल मिरच्या
१/२ वाटी सुके खोबरे
१/२ टे स्पून धने
५ लसूण पाकळ्या
२ हिरव्या मिरच्या
फोडणी करीता :
१/२ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१/२ टी स्पून हळद
कृती : वांगी धुवून पुसून कोरडी करावी. त्याचे देठ कापावे व त्याला मध्ये (+) चीर द्यावा. कांदा उभा पातळ कापावा. खोबरे किसून घ्यावे व गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. तीळ भाजून त्याची पूड करावी. चिंच भिजत घालून मग त्याचा कोळ काढावा.
कढई मध्ये तेल तापवून त्यामध्ये वांगी लालसर रंगावर परतून घ्यावी व बाजूला ठेवावी. तेल काढून बाजूला ठेवा व त्यातील दोन चमचे तेल गरम करून त्यामध्ये कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या व बाजूला ठेवा.
परतलेला कांदा, धने, मिरच्या, लसूण, भाजलेला खोबऱ्याचा कीस, तिळाची पुड मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी.
कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये वाटलेला मसाला घालून २-३ मिनिट परतून घ्यावा मग त्यामध्ये चिंचेचा कोळ, वांगी, मीठ व १/२ कप पाणी घालून चांगले शिजवून त्यामध्ये गुळ घालून मिक्स करून एक उकळी आणावी.
फोडणीच्या वाटी मध्ये तूप गरम करून त्यामध्ये मोहरी, हळद, कडीपत्ता पाने घालून खमंग फोडणी करून शिजलेल्या वांग्यावर घालावी. कोथंबीरीने सजवावे व गरम गरम चपाती/ पराठा किंवा भाता बरोबर सर्व्ह करावे.