कटाची आमटी : पुरण पोळी म्हटले की कटाची आमटी पाहिजेच. कट म्हणजे पुरण शिजल्यावर जास्तीचे काढलेले पाणी होय. कटाची आमटी ही एक अप्रतीम महाराष्ट्रातील लोकांची आमटी आहे. कटाची आमटी ही आंबट-गोड लागते. ती पुरण पोळी बरोबर किंवा गरम-गरम भाता बरोबर सर्व्ह करतात. ही आमटी नुसती खायला पण सुंदर लागते. ह्यामध्ये फोडणीमध्ये मेथ्याचे दाणे व धने वापरले आहेत. त्यामुळे सुरेख सुगंध व खमंग लागते. चिंचेच्या कोळामुळे आंबट चव येते. गुळ घालण्याच्या आयवजी शिजलेले पुरण घालावे त्यामुळे आमटी छान लागते व चवीला सुंदर लागते. तसेच थोडा गरम व थोडा गोडा मसाला वापरावा.
कटाची आमटी बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
२ कप कट
३/४ कप शिजलेले पुरण
२ टे स्पून चिंच कोळ
१/२ कप खोवलेला नारळ (मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.)
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/२ टी स्पून गरम मसाला
१/२ टी स्पून गोडा मसाला
कोथंबीर
मीठ चवीने
फोडणी साठी :
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून मेथ्या दाणे
१/४ टी स्पून धने
१/४ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून हळद
७-८ कडीपत्ता पाने
कृती :
डाळीचा कट, चिंचेचा कोळ, लाल मिरची पावडर, गरम मसाला, गोडा मसाला, वाटलेला नारळ, मीठ घालून शिजत ठेवावे मग त्यामध्ये शिजलेले पुरण घालून थोडे पाणी घालून परत आमटीला चांगली उकळी आणावी.
फोडणीच्या कढईत तेल गरम करून फोडणी करून खमंग फोडणी आमटीत घालून मग मिक्स करावी. ही आमटी थोडी पातळच करावी. कारण की ही आमटी थंड व्हायला लागली की घट्ट होत जाते. कारण की ह्याध्ये पुरण घातले आहे.
गरम-गरम आमटी पुरण पोळी बरोबर व भाता बरोबर सर्व्ह करावी.
The Puran Poli recipe is published in this – Article
The video of this Katachi Amti recipe and preparation method in Marathi can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=sRpMjlM-qgM