खमंग तिखट पंचामृत : पंचामृतही एक महाराष्ट्रीयन लोकांची प्रसिद्ध डीश आहे. जसे आपण जेवणामध्ये कोशिंबीर घेतो तसेच पंचामृतही बनवण्याची पद्धत आहे. पंचामृत हे चवीलाआंबटगोड व उत्कृष्ट लागते. म्हतारी माणसे व लहान मुले हे पंचामृत आवडीने खातात. चपाती बरोबर सर्व्ह करता येईल.
खमंग तिखट पंचामृत बनवण्यासाठी वेळ- ३० मिनिट
वाढणी – ४ जणासाठी
साहित्य :
१/२ कप चिंच
१/२ कप सुके खोबरे (किसून)
१/२ कप शेंगदाणे (भाजून)
१/२ कप तीळ (भाजून)
१/४ कप काजू तुकडे
६-७ हिरव्या मिरच्या
मीठ व गुळ चवीने
फोडणी साठी :
१/४ कप तेल
१ टी स्पून मोहरी
१/४ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून हळद
कृती :
सुके खोबरे, तीळ व शेंगदाणे भाजून थोडे जाडसर कुटून घ्यावे. चिंचेचा कोळ काढून घ्यावा.
कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हळद, हिंग, हिरव्या मिरच्या घालून खमंग फोडणी करावी मग त्यामध्ये कुटलेले खोबरे, तीळ, शेंगदाणे घालून एक मिनिट वाफ आणावी. वाफ आल्यावर त्यामध्ये काजूचे तुकडे मीठ, चिंचेचा कोळ, गुळ व एक कप पाणी घालून एक चांगली उकळी आणावी.