मसालेदार कांटोळी – Spiny Gourd in English and Kantola in Hindi: कांटोळी ची भाजी खूप चवीस्ट लागते. ही भाजी चपाती बरोबर छान लागते. ही मसाल्याची कांटोळी फार खमंग लागते.
मसालेदार कांटोळी बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
५०० ग्राम कांटोळी
१ मोठे कांदा
१ टे स्पून तेल
१/४ टी स्पून हिंग
मीठ चवीने
मसाला भाजी साठी
१ मोठा कांदा
५-६ लाल सुकलेल्या मिरच्या
२ टे स्पून सुके खोबरे कीस
१/४ टी स्पून हळद
१ टे स्पून धने
१ छोटा दलचीनीचा तुकडा
२-३ लवंग व वेलदोडे
१ टी स्पून सांबर मसाला
१/२ टी स्पून जिरे
८-१० लसून पाकळ्या
१ कप कोथंबीर
कृती : कांटोळी धुवून प्रतेक कांटोळीला मधोमध चीर द्यावा. म्हणजे त्यामध्ये मसाला भरता येतो.
मसाल्या करीता : एका कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये एक कांदा बारीक चिरून थोडा परतून घ्यावा मग त्यामध्ये लाल मिरच्या, किसलेले सुके खोबरे, धने, दालचीनीचा तुकडा, लवंगा, वेलदोडे, सांबर मसाला, जिरे, लसूण, कोथंबीर घालून थोडे परतून मग मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. व वाटलेला मसाला चिरलेल्या कांटोळ्यात भरावा.
एका कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग, कांदा घालून गुलाबी रंगावर खरपूस परतून घ्यावा. मग त्यामध्ये मसाला भरलेल्या कांटोळ्या घालून थोडे शिजण्यापुरते पाणी घालावे. मग मंद विस्तवावर भाजी शिजवून घ्यावी.