पडवळची भाजी : पडवळची – Snake Gourd in English and Chichinda in Hindi भाजी हे चवीला फार सुंदर लागते. ही भाजी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करता येते.पडवळची भाजी बनवतांना त्यामध्ये नारळाचे दुध वापरले आहे त्यामुळे भाजीला छान चव येते.तसेच नारळाचा मसाला वाटून घातला आहे त्यामुळे ही भाजी रश्याची झाली आहे.
पडवळची भाजी बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी:४ जणासाठी
साहित्य :
५०० ग्राम पडवळ
१ कप नारळाचे दुध
मीठ चवीने
मसाला वाटून
१/४ कप नारळ (खोवून)
१” आले तुकडा
१२ लसूण पाकळ्या
१/२” दालचीनी तुकडा
२ टी स्पून करी मसाला
२ टी स्पून तीळ
फोडणी करीता
२ मोठे कांदे (चिरून)
१/४ कप हिरवे ताजे मटार
१ टे स्पून तूप
कृती :
पडवळ धुवून चिरून घ्यावा. मसाला वाटून घ्यावा. कांदा चिरून घ्यावा.
एका कढई मध्ये तूप गरम करून कांदा घालून मटार घाला व वाटलेला मसाला घालून गुलाबी रंगावर भाजून घ्यावा. मग त्यामध्ये चिरलेला पडवळ व नारळाचे दुध घालून पडवळ शिजून घ्या. जर ही भाजी थोडी पातळ पाहिजे असेल तर थोडे पाणी घालून एक चांगली उकळी आणावी.