मावा मलई कुल्फी (Mawa Malai Kulfi) : मावा मलई कुल्फी ही रेसिपी घरी बनवायला खूप सोपी आहे. तसेच पाहुण्यांना द्यायला एक शाही डीश आहे. मावा मलई कुल्फी चवीला अप्र्तेम लागते.
बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट
फ्रीझमध्ये सेट करायला वेळ: ४ तास
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
१ कप खवा
२ कप दुध
१ कप मिल्क पावडर
१ कप फ्रेश क्रीम
१ कप साखर
१ टी स्पून वेलचीपूड
१/४ टी स्पून जायफळ
कृती : दुध व साखर मिक्स करून थोडे आटवून घेवून थंड करायला ठेवा. मग दुध, खवा, मिल्क पावडर, फ्रेश क्रीम, वेलचीपूड व जायफळ मिक्स करून मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्या. मग फ्रीजमध्ये सेट करायला ठेवा.
सर्व्ह करतांना वरतून काजू -बदामचे तुकडे घालून सजवा.
The English language version of the Mawa Malai Kulfi is given in this – Article