पुरी भाजी : पुरी भाजी ही डीश सगळ्यांना आवडते. उकडलेल्या बटाट्याची भाजी सगळेजण आवडीने खातात. पुरी भाजी कधी नाश्त्याला करता येते तर कधी मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला पण खूप छान आहे. तसेच बनवायला पण सोपी व झटपट होणारी डीश आहे.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य : पुरीचे
३ कप गव्हाचे पीठ
२ टे स्पून तेल (कडकडीत)
१ टी स्पून साखर
मीठ चवीने
तेल पुरी तळण्यासाठी
साहित्य : बटाट्याच्या भाजीचे
४ मध्यम आकाराचे बटाटे (उकडून सोलून थोडे कुस्करून)
२ मध्यम आकाराचे कांदे (उभा पातळ चिरून)
१ मध्यम आकाराचे लिंबू
मीठ व साखर चवीने
भाजीसाठी मसाला (मिक्सर मधून काढून)
१/४ कप कोथंबीर
४-५ लसूण पाकळ्या
१” आले तुकडा
२-३ हिरव्या मिरच्या
फोडणी साठी
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून हळद
७-८ कडीपत्ता पाने
कृती : पुरीची : गव्हाचे पीठ, तेलाचे मोहन, मीठ व साखर मिक्स करून पाणी वापरून चांगले घट्ट पीठ मळावे व १० मिनिट बाजूला ठेवावे. (पीठ घट्ट मळले म्हणजे पुऱ्या छान गोल होतात व तेलकट होत नाहीत) मग त्याचे मध्यम आकाराचे गोळे करून गोल गोल पुऱ्या लाटून घ्या.
कढई मध्ये तेल गरम करून छान पुऱ्या तळून घ्या.
बटाट्याची भाजी : बटाटे उकडून, सोलून थोडे कुस्करून घ्या. मग बटाट्याला लिंबू रस, साखर व मीठ चवीने लावून मिक्स करून बाजूला ठेवा. हिरवा मसाला बारीक वाटून घ्या.
कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, कडीपत्ता घालून चिरलेला कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. मग त्यामध्ये हळद, हिरवा मसाला व अगदी चवी पुरते मीठ घालून थोडे परतून घेवून त्यामध्ये बटाटे घालून चांगले मिक्स करून भाजी चांगली परतून घ्या.
गरम गरम पुरी भाजी सर्व्ह करा. त्या बरोबर पुदिना चटणी किंवा कोशंबीर पण छान लागते.
The English language version of the Puri Batata Bhaji recipe is published in this – Article