सगळ्या डाळीची आमटी : सगळ्या डाळीचीआमटी ही एक चविस्ट आमटी आहे. ह्यामध्ये तुरडाळ, चणाडाळ, मुगडाळ, मसूरडाळ व उडीदडाळ वापरली आहे. त्यामुळे ही डाळ पौस्टिक आहेच. भाताबरोबर ही आमटी फार छान लागते. ही आमटी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ह्याला खमंग फोडणी दिली की त्याची चव सुंदर लागते.
बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
१/२ कप तुरडाळ
१/४ कप चनाडाळ
१/४ कप मुगडाळ
१/४ कप मसूरडाळ
२ टे स्पून उडीदडाळ
२ टे स्पून कोथंबीर
मीठ चवीने
फोडणी साठी :
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
७-८ कडीपत्ता पाने
१/४ टी स्पून हळद
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून गरम मसाला
कृती :
तूरडाळ, चनाडाळ, मसूरडाळ, मुगडाळ, उडीदडाळ मिक्स करून धुवून डाळीच्या डबल पाणी घेवून कुकरमध्ये ३ शिट्या काढून घ्याव्यात.
एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, कडीपत्ता, हळद, लाल मिरची पावडर, मीठ घालून त्यामध्ये शिजलेली डाळ व गरम मसाला घालून थोडे पाणी घालून आमटीला चांगली उकळी आणावी. मग कोथंबीर घालून ढवळून भाता बरोबर सर्व्ह करावी.