शाही किसमिस मेथी भाजी : शाही किसमिस मेथी भाजी ह्या मध्ये किसमिस वापरले आहे त्यामुळे ह्याची चव फार छान लागते. सणावारी किंवा कोणी पाहुणे जेवायला येणार असतील तर ही भाजी नक्की बनवा त्यांना पण आवडेल.
शाही किसमिस मेथी भाजी बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
१ मध्यम मेथीची जुडी
१/४ कप किसमिस
१/४ टी स्पून आमचूर पावडर
१/४ टी स्पून धने पावडर
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हळद
मीठ चवीने
१/२ टे स्पून तेल
४-५ बदाम सजावटीसाठी (तुकडे करून)
कृती :
मेथीची भाजी निवडून बारीक चिरावी व धुवून त्यातील पाणी दाबून काढावे. म्हणजे मेथीचा कडूपणा बराच कमी होईल.
कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये किसमिस, धने पावडर, लाल मिरची पावडर, किसमिस घालून एक मिनिट परतून घ्यावे. मग त्यामध्ये मीठ, चिरलेला मेथी घालून थोडेसे पाणी घालून ८-१० मिनिट भाजी शिजवून घ्या. नंतर त्यामध्ये आमचूर पावडर घालून मिक्स करून घ्या. सर्व्ह करतांना वरतून बदामाचे तुकडे घालावे व चपाती बरोबर सर्व्ह करावे.
The English language version of the same typical Maharashtrian Methi Kismis preparation has been published in this – Article