शेवग्याच्या शेंगाची भाजी – Drumstick Vegetable Gravy : शेवग्याच्या शेंगाची भाजी ही भाजी महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवली आहे. शेवग्याच्या शेंगाची भाजी थोडी रस्सेदार बनवावी म्हणजे चवीला खूप छान लागते व खमंग पण लागते. ही भाजी चपाती बरोबर किंवा गरम-गरम भाता बरोबर सर्व्ह करावी.
शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: २ जणासाठी
साहित्य :
२ मोठ्या कवळ्या शेवग्याच्या शेंगा
१ छोटा कांदा (बारीक चिरून)
१ छोटा टोमाटो (बारीक चिरून)
१ छोटा बटाटा (सोलून मध्यम फोडी करून)
१/२ टी स्पून गरम मसाला
मीठ चवीने
१/४ कप कोथंबीर (चिरून)
फोडणी साठी :
१/४ टी स्पून टे स्पून तेल
१/२ टी स्पून मोहरी
१/२ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून हळद
मसाल्या साठी :
१/२ टे स्पून तेल
१/२ कप नारळ खोवलेला
१ छोटा कांदा (चिरून)
७-८ लसूण पाकळ्या
१ टी स्पून लाल मिरची पावडर
कृती :
मसाल्यासाठी : एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये कांदा, लसून घालून दोन मिनिट परतून घ्या व त्यामध्ये खोवलेला नारळ घालून २-३ मिनिट मंद विस्तवावर परतून घेवून लाल मिरची पावडर घालून थोडे परतून घ्या व मग मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
शेवग्याच्या शेंगा सोलून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून पाण्यामध्ये घाला. बटाटे सोलून त्याच्या फोडी करून पाण्यात घालून ठेवा.
एका कढईमधे तेल गरम करून कांदा, टोमाटो, शेवग्याच्या शेंगा, बटाट्याच्या फोडी घालून थोडे परतून घ्या. मग त्यामध्ये मीठ, हळद, गरम मसाला, १ कप पाणी घालून ५ मिनिट भाजी शिजवून घ्यावी. वाटलेला मसाला घालून १/२ कप पाणी घालून भाजीला चांगली उकळी आणावी वरतून कोथंबीर घालावी.
गरम गरम भाजी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करावी.
The English language version of the Maharashtrian Style Drumstick Gravy is published in this –Article
The Marathi language video of this Shevaga Batata Rassa Bhaji can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=XQmBsxkHqqU